वाशी (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी. या विद्यालयाचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी मध्ये 4 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. 

महाराष्ट्र राज्य शासकीय परिषद पुणे यांचे मार्फत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेतील शहरी विभागातून कुंजल नेताजी नलवडे  गुण -216 जिल्ह्यात 29 वी , सई दत्तात्रय डिसले गुण -214 जिल्ह्यात - 31वी , प्रज्ञा बाळासाहेब डोरले गुण- 210 जिल्ह्यात- 39 वी, सार्थक शरद पितळे गुण- 202 जिल्ह्यात - 54 वा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी मध्ये शहरी विभागातून हार्दिक सीताराम कवडे गुण - 270 जिल्ह्यात- 4 था , आर्यन दत्ता कुंभार गुण - 240 जिल्ह्यात-  23 वा. या गुणवंताचा विद्यालयात सत्कार करण्यात आला.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, जॉइंट सेक्रेटरी  अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुरेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष  दादासाहेब चेडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शिवशंकर चौधरी, मुख्याध्यापिका  एस. व्ही. गाढवे, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, कार्यकारी पदाधिकारी, नगराध्यक्षा, शिक्षण प्रेमी  नागरिक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,  ग्रामस्थ, पत्रकार यांनी अभिनंदन केले. शिक्षक जी. एम. देशमुख, एस. व्ही. क्षीरसागर, एस. बी. छबिले, एस. एस. धारकर, एस. एन. गायकवाड  यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.

 
Top