धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषद येथे मुख्यमंत्री योजना माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. नगर परिषद येथे या योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करुन व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेतील काही अटी रद्द करण्यात आल्या असुन वेळ व पैशाची बचत होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ऑफ लाईन अर्ज स्विकारुन जास्तीत जास्त योजनेचा लाभ सर्व सामान्यांना मिळण्यासाठी प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. 

आज रोजी योजनेतील लाभ मिळण्यासाठी संबंधित कक्ष अधिकारी सतिश सांगळे, युसुफ शेख, कुलकर्णी मॅडम, पंखे मॅडम यांच्या हस्ते अर्ज देतांना लाभार्थी महिला कल्पना घरबुडवे, साधना वाघमारे, पुनम गजधने, रेश्मा घरबुडवे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, संजय गजधने, किसन घरबुडवे, आलिशा कुरेशी,विशाल घरबुडवे,आयुष वाघमारे,फेरोज पठाण इतर उपस्थित होते. 

 
Top