तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चे चेअरमन पदी सुनील जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघ संघाच्या चेअरमन पदासाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. 

यावेळी बैठकीस खरेदी विक्री संघाचे संचालक सुधीर कदम, संजय धुरगुडे, सुहास साळुंके, शिवाजी बोधले, खंडाप्पा पावले, अभिजीत चव्हाण, राम चव्हाण, अनिल शिंदे, माणिक तोडकरी, भैरु जाधव, सुरेखा डोंगरे, अनिता वाघे, सुनिल जाधव आदी संचालक उपस्थित होते. निवडीनंतर महाविकास आघाडीच्या वतीने  शिवसेना सहसंपर्कप्रमुख  मंकरद राजेनिंबाळकर, महिल आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई शाम पवार (वडणे), अमोल कुतवळ, ॠषिकेश मगर, बाजार समिती संचालक संजय भोसले, शाम पवार, राजेंद्र मोरे पाटील, घुळप्पा रक्षे, डॉ. जितेंद्र कानडे, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्णा घोडके पाटील, श्रीकांत वाघ, उपतालुकाप्रमुख प्रदिप मगर, बापू चव्हाण आदिंसह तालुक्यातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top