धाराशिव (प्रतिनिधी)- परिक्षीत विक्रम पडवळ, वय 25 वर्षे, रा. उपळा मा., ता. जि. धाराशिव यांचे शाहुनगर ते उपळा गावात जाणारे रोडलगत असलेल्या गोडावुनचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 12.07.2024 रोजी 20.30 ते दि. 13.07.2024 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन सोयाबीनचे 40 कट्टे अंदाजे 1 लाख 8 हजार रूपये किंमतीचे चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या फिर्यादी परिक्षीत पडवळ यांनी दि.14.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुरंन 225/2024 कलम 331(4), 305(अ) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तेर पारधी पिढी, येथील दिपक तानाजी पवार यासह त्यांच्या एक साथीदारास गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत तेर पारधी पिढी येथून ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीचे सोयाबीन, बोलेरो पिकअप असा एकुण 3 लाख 81 हजार रूपयाचा माल जप्त केला. तसेच पुढील कार्यवाहिस्तव नमूद दोघांना चोरीच्या मालासह धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोह शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, प्रकाश औताडे, चालक रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.