कळंब (प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम कळंब येथील बालकाश्रमातील विद्यार्थ्यांना विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेतील नवोपक्रमशील शिक्षक सोपान जयसिंग पवार यांनी संपादित केलेले ' पारितोषिके प्राप्त गुणवंताची भाषणे ' हे पुस्तक ह भ प महादेव महाराज अडसूळ आश्रमातील विद्यार्थ्यांना सोपान पवार, पोलीस निरीक्षक रवी सानप साहेब, श्रीराम मायंदे साहेब, सतीश बाप्पा टोणगे, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर, माधवसिंग रजपूत, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड , कळंबतालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, प्राचार्य जगदीश गवळी ,प्राचार्य महादे गपाट आश्रुबा कोठावळे या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात, ज्ञान युगात शालेय शिक्षणाबरोबर, भाषण कौशल्ये शालेय वयातच विद्यार्थ्यांनीआत्मसात करावीत. भाषण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे अधिक वाचन करावे. वाचनानेच विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते म्हणून बालकाश्रमातील एखादा विद्यार्थी प्रसिद्ध वक्ता व्हावा. शहरी ,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुका स्तर भाषण स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभागी व्हावे सोपान पवार यांनी संपादित केलेल्या पारितोषिक प्राप्त गुणवंताची भाषणे या भाषण संग्रहाचा मुख्य उद्देशच हा आहे.