धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल नवनियुक्त खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पवनराजे कॉम्प्लेक्स धाराशिव या ठिकाणी आज करण्यात आले होते. 

शाल, श्रीफळ, हार, बुके, कवड्याची माळ व तुळजाभवानी मातेचा फोटो देऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा यथोचित सत्कार लालासाहेब मगर व बशीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.

सर्वसामान्य जनता व शिक्षक यांना सन्मानाची व आपुलकीची वागणूक देऊन शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रशासनाकडे सदैव पाठपुरावा करून प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी खासदार ओमराजे यांनी नेहमीच तळमळीने प्रयत्न केले आहेत असे मत लालासाहेब मगर यांनी कार्यक्रमात व्यक्त केले. 

यावेळी बशीर तांबोळी यांनीही मनोगत व्यक्त करून शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य न्याय देण्याची भूमिका खासदार साहेबांची नेहमीच असल्याचे  सांगितले.तसेच अविनाश मोकाशे यांनी पण आपले विचार व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना, शिक्षकांच्या पाठीशी मी या पुढेही खंबीरपणे उभा राहणार असून शिक्षकांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करणार असल्याची भावना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले. 

यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर तांबोळी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, राज्य महिला प्रतिनिधी सविताताई पांढरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, एन. टी. अदटराव, नगर परिषद विभाग जिल्हा प्रमुख राजेंद्र पवार, जिल्हा चिटणीस महेबूब काझी, शाहू शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुरेश भालेराव, जिल्हा सहसचिव राजाभाऊ आकोसकर, कळंब तालुकाध्यक्ष महेंद्र रणदिवे, धाराशिव तालुकाध्यक्ष नागनाथ मुडबे, जगदीश जाकते, शाहू शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन मिलिंद धावारे, अल्पसंख्यांक सोसायटीचे व्हाईस चेअरमन मालोजी वाघमारे, श्रीमती ज्योती काठेवाड,हनुमंत माने,डी. एस. वाघमारे, मारुती काळे, मगतराव व्ही.डी., बाळासाहेब चिवडे, उत्तम चव्हाण, राजेंद्र नारायणकर, प्रदीप तांबे, बाळकृष्ण पाटील,तानाजी शेळके, अमीन शेख, विकास घाडगे, संतोष डोके, लक्ष्मण घोडके, ज्ञानेश्वर घोडके, विष्णू पाळवदे, श्रीहरी बिडवे, सोमनाथ केवटे,शिवाजी साखरे,बाळासाहेब माने, एम. ए. हिप्परगे, विठ्ठल उंबरे, सतीश ढेकणे, शेखू जेटीथोर, रजनीकांत तुपारे, नागेश बोडके, मोहन नागटिळक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top