तेर (प्रतिनिधी)-तडफडणा-या चिमणीला शाळेतील बालकांनी वाचविल्याची घटना  घडली. 

प्रत्येक घराच्या अंगणात बागडणारी, नाचणारी चिऊताई  धाराशिव तालुक्यातील कोळेकर वाडी येथील जिल्हा परिषद प्रशाला जेवणाच्या सुट्टीत मुलांना शाळेच्या अंगणात तडफडताना दिसली. जखमी अवस्थेतील चिमणी पाहून बालकांच्या मनातील संवेदनशीलता जागृत झाली. आणि बालकांनी  पटकन लगबग चालू केली. कुणी तांदुळ आणून चिमणीच्या समोर टाकले. कुणी  स्वतःच्या बाटलीतील पाणी टोपणात घेऊन ते चिमणीच्या समोर ठेवले. आणि तरीही त्या चिमनीला हलता येत नव्हते .तर मुलांनी स्वतः हातात पकडून तिला अक्षरशः पाणी पाजले .तांदुळाचे दाणे खाऊ घातले. ही सर्व कृती  शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पाटील  आणि सहशिक्षिका शांता सलगर  पाहत होते. बालकांची ही घाई गडबड  प्रत्यक्ष जेव्हा बालकांची  पक्षाबद्दल असलेले प्रेम पाहून उपस्थित भारावून गेले .खरंच  बालकांमध्ये रुजलेली संवेदनशीलता पाहून बालकांच्या उपस्थितांना खूप अभिमान वाटला. चारा, पाणी पिऊन चिमणी भुर्रकण उडून गेली. तेव्हा त्या बालकाच्या आनंद गगनात मावेनासा झाला.


 
Top