तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणामध्ये उमेद अभियान अंतर्गत सी.आर.पी. गट तेर यांच्या वतीने परसबाग तयार करण्यात आली. उमेद च्या प्रेरीका पूजा चव्हाण ,भाग्यश्री  भक्ते, ज्योती  नाईकवाडी , वैशाली देवकते, बंॅक सखी कामधेनू  देशमाने यांनी पालक, चुका,शेवगा, वांगी,टोमॅटो , भोपळा, मिरची यांची रोपे लाऊन परसबाग तयार  केली. परसबाग तयार केल्याबद्दल   मुख्याध्यापिका सुरेखा कदम,शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.

 
Top