कळंब (प्रतिनिधी)- गुरुजी सेवानिवृत्त झाले तरी आपल्या हातून चांगले कार्य नेहमी समाज उपयोगी आपल्या हातुन घडावे व साने गुरुजींच्या पावलावर पाऊल टाकीत त्यांचा वसा जोपासवा असे कळंब शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिकाजी नारायण शिलवंत यांच्या 85 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा कळंब येथे दि. 16 रोजी सर्व विध्यार्थ्यांना शालेय शिक्षण उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले . यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.