धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्हा मुस्लिम आरक्षण कृती समितीचा वतीने दि 19 जुलै रोजी धनगर समाजाच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे व त्याचे पत्र देखील देण्यात आले आहे. धाराशिव शहरात मागील पाच दिवसांपासून धनगर समाजातील चार तरुण आमरण उपोषण करत आहेत. त्याची न्याय मागणी त्यांना एस टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात आलेले परंतु महाराष्ट्र शासन यांची अंमलबजावणी करत नाही ही बाब अंत्य गंभीर आहे. महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाचा सहनशीलता अंत न पाहता ताबडतोब धनगर समाजाची न्याय मागणी पुर्ण करावी . त्यांनी सुरू केलेल्या या लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला मुस्लिम आरक्षण कृती समितीचा पाठिंबा देत आहोत असे पत्र उस्मानाबाद जिल्हा मुस्लिम आरक्षण कृती समिती च्या वतीने देण्यात आले आहे या पत्रांवर मसुद शेख , खलील पठाण, शेख आयाज ( बबलु) , बिलाल तांबोळी, कादरखान पठाण , वसीमखान पठाण, बाबा मुजावर, अफोरोज पिरजादे, शेख अनवर, समीयोद्दीन मशायक, सरफराज मोमीन, रुहुला शेख इत्यादींच्या पाठिंबा पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.