धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला गेल्या 70 वर्षापासून  आतापर्यंत सत्तेत  आलेल्या सर्वच सरकारने अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणापासून वंचित ठेवले आहे त्यामुळे धनगर समाजाचे कधीही भरून न निघणारे  इतके मोठे नुकसान झाले आहे.

आतापर्यंत धनगर समाज बांधवांनी अनुसूचित जमातीचे (एस.टी.चे) प्रमाणपत्र व आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून संबंध महाराष्ट्रभर रास्ता रोको, उपोषणे आदी स्वरूपाचे तीव्र आंदोलन केले तरीही आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारने धनगर समाजाच्या या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही, त्यामुळे सद्यस्थितीत धनगर समाजाचा सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रोष असून समाज संतापलेल्या अवस्थेत आहे. आतापर्यंत बऱ्याच राजकीय पक्षांनी धनगर समाज बांधवाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ म्हणून फक्त मता पुरता वापर करून घेतला व समाजासोबत वारंवार बेईमानी केली आहे.त्यामुळे (दि.15) सोमवार पासून धाराशिव जिल्ह्यातील समाज बांधव शाम तेरकर, कमलाकर दाणे, समाधान पडुळकर व राजू मैंदाड हे चौघेजण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. ह्या चौघांनी जोपर्यंत सरकार धनगर समाजाच्या मागण्या मान्य करत नाही व जीवात जीव असेपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. तरी सरकारने धनगर समाजाच्या भावना समजून घेऊन गांभीर्यपूर्वक विचार करावा असे धाराशिव जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


धनगर समाजाच्या सरकार कडे प्रमुख दोन मागण्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियाचे बोगस जातीचे धनगड प्रमाणपत्र व उर्वरित महाराष्ट्रातील इतर कोणीही घेतलेले धनगड प्रमाणपत्र असेल तर ते रद्द करून त्या प्रमाणपत्राचे जात वैधता प्रमाणपत्र ही रद्द करावे. सुधाकर शिंदे कमिटीचा अहवाल तात्काळ घेऊन धनगर जमातीला कायद्याने घटनेने दिलेले अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.)चे सर्व धनगर समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्यात यावे.


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या धनगर समाज बांधवांच्या उपोषणाला विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात मिळत आहे पाठिंबा.

आता पर्यंत सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा,सकल मराठा समाज मेडसिंगा, सैनिक फेडरेशन धाराशिव, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना धाराशिव, राम राज्य प्रतिष्ठान धाराशिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट),जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिव,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धाराशिव, भारतीय जनता पार्टी धाराशिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य शाखा, जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव लहुजी शक्ती सेना कळंब यांच्यासह चोराखळी,देवसिंगा (तु) गुळहळ्ळी, धनगरवाडी, गुजनुर, दहिटणा, शहापूर,उमरगा(चि), ढोकी, टाकळी (बेंबळी) राजुरी, मेडशिंगा घाटंग्री,भातंबरी, यमगरवाडी, कदमवाडी, खडकी, बसवंतवाडी शिराढोण आदी ग्रामपंचायतच्या सरपंच  उपसरपंच व सदस्यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून लेखी पाठींबा दिला आहे.

 
Top