तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील  कोळेकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत  वैष्णवांचा मेळा आज रंगला  होता.                             

धाराशिव तालुक्यातील कोळेकरवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेत बाळ गोपाळ यांनी शाळेत 15 जुलैला पायी दिंडीचा आनंद घेतला. आषाढी वारी निमित्त शाळेतून दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली. दिंडीमध्ये गावातील नागरिकही  सहभागी झाले होते. बाळ गोपाळांनी आज दिंडी कशी असते व पायी जात असताना आपण देवाच्या नामस्मरणात कसे तल्लीत होतो याचा अनुभव घेतला. हरिनामाच्या गजरात ,जल्लोषात, दिंडी  नाचत, गात ,अभंग म्हणत  दिंडी चालली होती आणि सर्व उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध होऊन पाहत होते जसे वारकरी भक्तांना ऊन ,वारा ,पाऊस याची तमा नसते तसेच आज हे बाल वारकरी ही पावसाची पर्वा न करता देवाच्या भजनात तल्लीन झाले होते. गावाला शाळेचा आधार व शाळेला गावाचा अभिमान याची प्रचिती कोळेकरवाडी येथे आज दिसून आली. फोटो -कोळेकरवाडी येथील जिल्हा परिषदेतील बाल गोपाळानी आषाढी वारी निमित्ताने दिंडी काढली.

 
Top