तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीकाँग्रेस अजितपवारगट कडे महायुती बैठकीत प्रयत्न करु असे आश्वासन बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट  जनसन्मान महामेळाव्यात सहभागी गेलेल्या तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  पदाधिकारी यांच्याशी चर्चा करताना सांगितल्याची माहीती तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी दिली. 

रविवार दि. 14 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यस्तरीय बैठक बारामती येथे संपन्न झाली. बैठकी नंतर  यावेळी राष्ट्रवादीकाँग्रेस अजितपवारगट वतीने प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंञी अजित पवार व  नवनिर्वाचीत खासदार सुनेञाताई पवार यांचा देविची मुर्ती व कवड्याची माळ, देविचा चरणाचे कुंकु देवुन सत्कार केला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीकाँग्रेस ला तुळजापूर तालुक्यातुन चांगले मते मिळाले आहेत. तर पक्ष ताकदीत आणखी वाढीसाठी कामाला लागा. तुळजापूर विधानसभा मतदार संघ महायुतीकडुन राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

यावेळी खासदार  सुनेञाताई पवार यांनी लवकरच म्हणजे आठ ते दहा दिवसाचा आत कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येवु असे सांगितले. आमची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, तालुका अध्यक्ष  श्रीकृष्ण सूर्यवंशी, युवक तालुकाध्यक्ष नितीन रोचकरी, युवक नेते गोरख पवार, युवक शहर कार्याध्यक्ष अनमोल शिंदे, शहर सचिव अभय माने सह पदाधिकारी उपस्थितीत होते.

 
Top