तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरा जवळील भवानी रोड येथील भाजीमंडई येथे असलेल्या काँम्पलेक्स मध्ये चालु असलेल्या चक्रीमटका जुगार अड्यावर धाड टाकुन पोलिसांनी दोघास ताब्यात घेवुन 15 हजार 180 रुपये सह  चक्रीमटका जुगार साहित्य जप्त केले.

तुळजापूर शहरात अनेक ठिकाणी गेली अनेक वर्षा पासुन चक्री जुगार चालु आहे माञ याच एकमेव्य  चक्री जुगार अड्यावर धाड ठाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे चक्री जुगाराचे प्रस्थ वाढत आहे.त्याचा तुळजापूर पोलिस स्टेशन बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि, जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी रविवार दि 14 रोजी 03.45वाजण्याच्या सुमारास तुळजापूर पो.ठाणे हद्दीत भवानी रोड येथील भाजी मंडई येथे असलेल्या कॉम्पलेक्स मधील एकरुममध्ये छापा टाकला. यावेळी अभिजीत उर्फ अभि रमेश लोले, वय 25 वर्षे, रा. तुळजापूर खुर्द, ता. तुळजापूर जि. धाराशिव, संग्राम नागेश भोजने, वय 29 वर्षे, रा. तुळजापूर खुर्द, ता. तुळजापूर जि. हे . भवानी रोड येथील भाजी मंडई येथे असलेल्या कॉम्पलेक्स मधील एका रुममध्ये चक्री मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 15180  रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

 
Top