तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प प्रशाद योजना अंतर्गत विकास आराखडा तयार केला जात असुन हा आराखडा आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर राजकारणाचा केंद्र बिंदू बनू पाहतोय. तुळजापूर विकास आराखडा वरुन सताधारी विरोधक आमने सामने आले आहेत. आगामी विधानसभा नगर परिषद निवडणुक पार्श्वभूमीवर विकास आराखडा महत्वपुर्ण विषय बनला. तुळजापूर विकास आराखडा माध्यमातून दोन विषय सध्या ऐरणीवर आले आहेत. एक विस्थापित होण्याची भिती व दर्शन मंडप हे दोन विषय तुळजापूर विकास आराखडा बाबतीत अडथळे ठरत आहेत. या बाबतीत स्पष्ट भूमिका जाहीर करणे प्रशासनाचे काम आहे.
प्रथमता दर्शन मंडप जागे बाबतीत गहजब होवुन एक दिवस शहर बंद करण्यात आले होते. त्याबाबत आता प्ल़ान बी मध्ये स्पष्टता आली आहे. सदरील प्लान बी जाहीर करुन हरकती सुचना सात दिवसाच्या आत सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर विकास आराखडा गेली अनेक माहिन्यापासुन तुळजापूर शहरातील प्रमुख असा चर्चेचा केंद्र बिंदू बनला आहे. श्रीतुळजाभवानी मंदीरावर अनेकांची रोजीरोटी अवलंबून असल्याने आपण विस्थापित झाल्यानंतर करायाचे काय असा प्रश्न मंदीर परिसरातील मंडळी ना पडला आहे. शासन आपले योग्य पुर्नवसन करेल का याची भितीयुक्त चिंता त्यास भेडसावत आहे.
या योजने माध्यमातून तिर्थक्षेञ तुळजापूरचा चेहरामोहरा बदलणार आहे. या योजनेतून तुळजापूर शहराचे धार्मिक अध्यात्मिक ऐतिहासिक महत्व वृद्धिगत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे तुळजापूर तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा, सुलभ दर्शन तसेच तुळजापूर शहराचे लोप पावत चाललेले ऐतिहासिक व पौराणिक रूप ठळक करणारा, तसेच तुळजापूर शहरातील पुजारी बांधव, व्यापारी, तुळजापूर शहरवासीयांची व तुळजापूर तालुका वासियांची आर्थिक उन्नती साधणारा हा प्रकल्प आहे. त्याच संदर्भाने हा विकास आराखडा शहरवासियांसाठी होत आहे असा दावा प्रशासन व सत्ताधारी करीत आहेत. शहरवासियांच्या सुचनांचा विचार करूनच विकास आराखडा झाला पाहिजे. यासाठी समस्त तुळजापूर शहरवासीयांची विचार विनीमय बैठक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 19 जुलै रोजी दुपारी तीन वाजता श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालय तुळजापूर येथे आयोजित केली आहे. यात राजकीय,सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व ईतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व शहरवासीयांनी या विचार विनिमय बैठकीस उपस्थित राहून आपले विचार व मत या ठिकाणी मांडावेत असे आवाहन करण्यात आले आहे.