धाराशिव (प्रतिनिधी)-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर व महायुती सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत घेण्यात येत असलेले समाजाच्या हिताचे निर्णय याच्यावर प्रभावित होऊन धाराशिवचे नेते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने धाराशिव शहर व परिसरातील असंख्य युवकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने लोंढे प्रतिष्ठान धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष सुरज लोंढे व त्यांचे सहकारी यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला. या प्रवेशासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस सचिन लोंढे यांनी पुढाकार घेतला.


 
Top