तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदा जून महिन्यात प्रारंभीच चांगला पाऊस पडल्याने  तालुक्यात खरिपाच्या 103 टक्के पेरण्या जुलै अखेरपर्यत पुर्ण झाल्या आहेत. ही माहिती अवधुत मुळे तालुका कृषी यांनी दिली. यंदा पुनश्च सर्वाधीक सोयाबीन ची पेरणी 84585.9हेक्टर क्षेत्रात झाली आहे. तर सर्वात कमीसुर्यफुल ची शुन्य टक्के पेरणी झाली आहे.त्यामुळे पुनश्च सोयाबीन  उत्पन्न वाढ  होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

तालुक्यात एकूण खरीपचे सरासरी 110308.216  हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी 97727.6 हेक्टर क्षेत्रावर जुलै अखेर 103 टक्के पेरणी झाली आहे. तुळजापूर तालुक्याचे एकुण भौगोलीक क्षेत्र 153907.48 हेक्टर असुन वहीतीखालील क्षेत्र 132108.66 हेक्टर आहे.  खरीपसाठी क्षेत्र 110308.216  हेक्टर आहे. भात 4.5, ज्वारी 47, बाजरी 32, मका 635, इतर तृनधान्ये 244, एकुण  तृनधान्ये 962.5. तुर 4031.2, मुग 2177.2, उडीद 3838, इतर कडधान्ये 265, एकुण  कडधान्ये 10302.4,  सुर्यफुल 151, सोयाबिन 84547, तीळ 153, भुइमुग 11.9, कारळ 155, इतर तेलबिया 27 एकुण  तेलबिया 84585.9. ऊस अडसाली नवीन लागवड उस अडसाली गळीताचे 175, उस पुर्वहंगामी नवीन लागवड 105, उस पुर्वहंगामी गळीताचे 0 उस लागवड सुरु 33 उस सुरु गळीताचे 00  उस खोडवा 1449 एकुण ऊस 1867 एकुन 97727.म्हणजे 103 टक्के खरीप पेरणी झाली आहे.

 
Top