धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील श्री साई श्रद्धा एज्युकेशन च्या वतीने चालवण्यात येत असलेल्या मुलींच्या वस्तीगृहासाठी जिल्हा न्यायालयामध्ये कार्यरत असलेले ॲड. नामदेव तेरकर व ॲड. जयश्री तेरकर यांनी साई श्रद्धा एज्युकेशनला भेट देऊन त्यांच्याकडे असलेले नीट तयारीसाठीचे शैक्षणिक साहित्य तसेच बेसिक फाउंडेशनचे शैक्षणिक साहित्य श्री साई श्रद्धा एज्युकेशनला भेट दिले आहे.

श्री साई श्रद्धा एज्युकेशनच्या वतीने नीट ऑनलाइन टेस्ट सिरीज घेतल्या जातात. सध्या या टेस्ट सिरीजचा विस्तार 14 जिल्ह्यामध्ये झालेला आहे. या टेस्ट सिरीजच्या मार्फत आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेला आहे. या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन तेरकर दांपत्याने सामाजिक जाणिवेतून त्याच्या वतीने गोरगरीब मुलांना शैक्षणिक कार्यात मदत म्हणून हे शैक्षणिक साहित्य श्री साई श्रद्धा एज्युकेशनला भेट दिलेले आहे. श्री साई श्रद्धा एज्युकेशनला शैक्षणिक साहित्य भेट दिल्याबद्दल संस्थेचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे व संचालिका उषाताई लांडगे यांनी तेरकर दाम्पत्यांचा यावेळी सत्कार केला.

 
Top