धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी धाराशिव शहरातील हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला आलै या दर्गाह शरीफ मध्ये यांच्या मजारवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव खलील पठाण यांच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, यांच्या हस्ते चादर चढवून दि.22 जुलै रोजी साकडे घातले.
धाराशिव शहरातील दर्गाह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन तावडे, शहर कार्याध्यक्ष अकबर खान पठाण, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फड, माजी सैनिक विभागाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, नवगिरे, समीर खतीब, एम.डी. आरेफ, सादिक भाई, जे.के. साहब, निहाल शेख, जानराव, सुहास मेटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.