भूम (प्रतिनिधी)-साहिल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुरुपौणिर्मेनिमित्त गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य संयोगिता गाढवे यांच्या हस्ते गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना संजय गाढवे म्हणाले कि, मी नशीबवान आहे. गुरुजनांचा माझ्या सर्व गुरुवर्याचा याच उपकार, प्रेम, आशीर्वाद घेऊन इथपर्यंत आलो आहे. तसेच जीवनामध्ये आई-वडील व गुरु यांचे अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे. या गुरुजनांचा सन्मान करण्याचा जो मला योग येतो आहे. त्यामुळे खरोखरच भाग्यवान आहे. राजकारण, व्यवसाय, शेती क्षेत्रामध्ये यशस्वी आहे. यावेळी त्रिंबक गाढवे, सुरज गाढवे, किरण जाधव, सुनिल थोरात, युवा नेते साहिल गाढवे, रामभाऊ बागडे, मुशिर सेख यांच्यासह गुरुजन, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन गुंजाळ तर आभार जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य संयोगिता गाढवे यांनी मानले.


 
Top