भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या  रामदास हातमोडे यांचे चिरंजीव गोपीनाथ हातमोडे हे सीए झाले आहेत. 

गोपीनाथ यांचे प्राथमिक शिक्षण पाटसांगवी जिल्हा परिषद शाळेत झाले असून, जुनियर कॉलेजचे शिक्षण बार्शी येथील  बी.पी. सुलाखे या कॉलेजमध्ये झाले.

बारावीनंतर त्यांचे पुढील शिक्षण पुणे येथे झाले. त्यांच्या घरचे जास्त कोणी शिकलेले नसल्यामुळे त्यांना सीए बद्दल माहिती नव्हती. पण त्यांच्या दाजींनी त्यांना सीए करण्याबद्दल मार्गदर्शन केले व ते त्यांनी सार्थ ठरविले. त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती की माझा मुलगा खूप मोठ्या पदावर असावा. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याठी गोपीनाथ ने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला आणि वडिलाचे स्वप्न पूर्ण  केले.

बी.कॉम. करत असतानाच त्यांनी सीए परीक्षांची तयारी सुरू केली. सीए करत असताना, त्यांनी आर्टिकलशिप ( Training) KPCA & Co या नामांकित  CA Firm  मध्ये केली आहे. आर्टिकलशीप नंतर पुढील परीक्षा देत असताना सुद्धा त्यांनी सीएच्या फर्ममध्ये काम करत होते. पुढील एम. कॉम. चे शिक्षण व सीए फायनल चे शिक्षणही सीए च्या फर्म मध्ये काम करतच पूर्ण केले आहे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी हे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला.

आता त्याचं स्वप्न आहे की धाराशिव आणि धाराशिव शेजारील शहरांमधील मधील बिझनेस लां मार्गदर्शन करुन मोठे करायचे आहे. हे त्यांचे स्वप्न ते लवकरच पूर्ण करतील असा त्यांना विश्वास आहे. सीए झाल्याबद्दल त्यांच्या सर्व नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. गावातील ग्रामपंचायत व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले, कौतुक केले. त्यावेळेस त्यांनी इतरांनाही शिक्षणाबद्दल प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले.


 
Top