धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात राष्ट्रीय सेवा योजना आणि उन्नत भारत अभियान यांच्या वतीने “एक पेड मॉ के नाम“ महावृक्ष लागवड अभियान अंतर्गत 1 स्वयंसेवक 3 वृक्ष लागवड यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
वृक्ष नैसर्गिक पदधतीने ऑक्सिजन बनविणारे पर्यावरणातील महत्वाचे घटक आहेत. प्राणवायू देणाऱ्या झाडांची लागवड करणे व संगोपन करणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगानेच विद्यापीठ उपपरिसरात महावृक्ष लागवड अभियान संंचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनात उत्साहात राबविण्यात आले. विद्यापीठ उपपरिसरातील वसतीगृह परिसरात महावृक्ष लागवड उपक्रमात सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. जितेंद्र शिंदे, कमवा व शिका योजना समन्वयक डॉ. गोविंद कोकणे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कुलकर्णी, यांच्या उपस्थितीत महावृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रंथालय सहाय्यक तुकाराम हराळकर, नागनाथ शिंदे, दशरथ कवडे, सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.