भूम (प्रतिनिधी) - भूम तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या बाबतीत सत्ताधारी व विरोधक यांच्या उदासीनतेचा विरोधात अनोखे आंदोलन दि. 25 जुलै रोजी करण्यात आले केले. 

सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सत्ताधारी व विरोधकांचा अनोखा अ शुभ विवाह सोहळा मोठया धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी भूम नगर पालिके जवळील नागोबा चौकात सुपारी फोडणे व हळदी समारंभ पार पडला. तर दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील गोलाई चौकात सत्ताधारी आणि विरोधक यांचा विवाह पार पडला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शासनाला जागे करण्याच्या हेतूने मराठा समाज बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी अनोखा विवाह सोहळा साजरा केला. यावेळी नवरा नवरीची शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजातील युवकांनी व जेष्ठानी सत्ताधारी व विरोधातील नेत्यांचे मुखवटे लावून वऱ्हाडी मंडळीत सहभाग घेतला होता.

 
Top