तुळजापूर (प्रतिनिधी)- विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर परभणी यांनी विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर गुरुवार दि.25 जुलै रोजी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे येवून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन मनोभावे पुजा केले. या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारिक पुजारी सचिन कदम यांनी केले.
देवीदर्शनानंतर आमदार विटेकर यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फ करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी, शहराध्यक्ष महेश चोपदार, संदीप गंगणे, बबनराव गावडे, माजी नगरसेवक सुभाष कदम, गोरख पवार, अभय माने आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.