कळंब (प्रतिनिधी)- भाटशिरपुरा गावचे सुपुत्र तथा प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी पुणे येथील उद्योजक दिनेश सुर्यकांत वाघमारे यांना रोटरी क्लब कळंब चा कळंब भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री दिनेश वाघमारे हे जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुराचे माजी विद्यार्थी आहेत. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पुर्ण केले . सुरवातीच्या काळात पुणे या ठिकाणी एका कंपनीत नौकरी करुन त्यांनी स्वतःची अग्निशामक गाड्या बनवण्याची कंपनी निर्माण केली आज अनेक कर्मचारी त्यांच्या कंपनीत काम करतात देशात नाही तर देशाबाहेर ही त्यांनी बनवलेल्या अग्निशामक गाड्यांना मागणी आहे. अशा ग्रामिण भागात शिक्षण घेऊन स्वतःची कंपनी तयार करणाऱ्या दिनेश वाघमारे यांचा नुकताच रोटरी क्लब कळंबच्या वतीने कळंब भुषण पुरस्कार देऊन सन्मानित केले .
ही बाब भाटशिरपुरा गावासाठी भुषणावह आहे . शिक्षण घेतलेल्या युवकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रेरणा घ्यावी व ग्रामिण भागातून अनेक उद्योजक तयार व्हावेत यासाठी शाळेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
सत्कार प्रसंगी बोलतांना वाघमारे म्हणाले की, प्रगती करायची असेल तर खडतर परिश्रम करणे गरजेचे आहे.आपले ध्येय समोर ठेवून सतत काम करणे गरजेचे आहे. प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळतेच. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नाला मनमोकल्या मनाने उत्तरे दिली.
याप्रसंगी त्यांचे सहकारी तथा विद्यार्थी दशेत त्यांना सहकार्य करणारे अभियंता इलाही शेख,गावचे उपसरपंच सुर्यकांत खापे,ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड , सादिक शेख,रमेश रितपुरे युवाव्याख्याते प्रतिक गायकवाड ,अशोक खापे,सतिश पवार, शाहु सावंत,सचिन कदम शहाजी वाघमारे,पांडुरंग वाघमारे,बलभिम सावंत.दशरथ कदम तसेच शाळेतील शिक्षक सचिन तामाने,शहाजी बनसोडे,लिंबराज सुरवसे,राजाभाऊ शिंदे ,श्रीमती प्रमोदिनी होळे,श्रीमती रंजना थोरात यांच्यासह गावातील नागरीक व प्राथमिक शाळेतील त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे ,सुत्रसंचलन श्रीकांत तांबारे तर आभार अमोल बाभळे यांनी मानले.