धाराशिव  (प्रतिनिधी)- दि. 11 जुलै 2024 वार गुरुवार या दिवशी श्री गुरुदेव महर्षी गज अरविंद व गुरु माईच्या सानिध्यामध्ये महर्षी अरविंद फाउंडेशन आश्रम वडगाव सिद्धेश्वर गुरुपौर्णिमा उत्सव ( यास पूजा ) साजरा करण्यात आला. सौ अर्चनाताई घोगरे यांनी गुरुपूजन केले अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे,  घेऊन जाणारे गुरु जीवनातील गुरूंचे महत्त्व काय याचे मार्गदर्शन गुरुमाईने  अत्यंत सुंदर शब्दात केले.

 संसार म्हणजे आसक्ती भौतिक सुख इच्छा आकांक्षा स्वार्थ होय परंतु या मधूनही शांती समाधान शाश्वत सुख प्राप्त होत नाही. यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये बदल आवश्यक आहे. मनुष्याने आपल्या जीवनाकडे आणि शरीराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी भूतशुद्धीक्रिया आज खूप गरजेची आहे. त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या संकटासाठी खूप आवश्यक आहे. श्री गुरुदेव महर्षी गज अरविंद यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महर्षी अरविंद फाउंडेशन शाखा वडगावचे अध्यक्ष बाळासाहेब मुंदडा, सदस्य प्रवीण मुंडे, हरी क्षीरसागर, नित्यानंद स्वामी, सौ अर्चनाताई घोगरे, रोहन मुंडे, रोहन सस्ते तसेच पुरुष व महिला साधक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसबे यांनी केले.

 
Top