तुळजापूर (प्रतिनिधी)-  खरीप हंगाम कामे सुरु झाल्याने व शालेय सुट्या संपल्याने श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संखेत मोठी घट झाली आहे.

यंदाच्या वर्षी उन्हाळा सुट्यात श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी प्रचंड संखेने गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर पहाटे एक तास व सकाळी सात नंतर दिवसभर अडीच ते तीन तास दर्शनार्थ  लागत होते. तर अभिषेक पासेस उघडताच विशेषता गर्दी दिनी म्हणजे पोर्णिमा, मंगळवार, शुक्रवार व सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार लवकर संपत होते.

यंदा उन्हाळात भाविकांना पाणीटंचाई खंडीत विजपुरवठा याचा ञास सहनकरावा लागला तर पैसे खर्चुन मुलभूत गरजा तिर्थक्षेञी पुर्ण कराव्या लागल्या. माञ  7 जुन ला मृग नक्षत्र दमदारपणे बरसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांची कामे सुरु झाल्याने ग्रामीण भागातील भाविक वर्ग देवीदर्शनार्थ येणे कमी झाला. लगेच 15 जुननंतर शाळेच्या सुट्या संपताच शाळा सुरु झाल्याने तो भाविक वर्ग येणे कमी झाला. त्यामुळे मंदीरातील सुरक्षा यंञणेवरील ताण कमी झाला असुन अधिकारी वर्ग उसंती घेत आहे.

सध्या पोर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी देवीदर्शनार्थ भाविकांची संख्या बरी असते. इतर वेळी अर्धा तासात देविदर्शन घडते. सध्या भाविक येणे बंद झाल्याने शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने अर्थिक व्यवहार थंडावले आहेत. सध्या रस्त्यावर उन्हाळा कालावधी सारखी वर्दळ दिसत नाही.


देवीदर्शनार्थ वारकऱ्यांची गर्दी होणार !

आषाढी एकादशी ते पोर्णिमा या कालावधीत तिर्थक्षेञ पंढरपूरला श्री विठ्ठल रुकमीणी दर्शनार्थ आलेला भाविक श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येत असल्याने या कालावधीत वारकरी भाविकांची गर्दी तिर्थक्षेञ तुळजापूरात असणार आहे.

 
Top