धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परीषद अंतर्गत सुरु असुन सदर कामे वेळेत पुर्ण न करणाऱ्या ठेकेदारांची कोणत्याही प्रकारची गय न करता कामात कुचराई केल्याचे लक्षात आले असता नियमानुसार सदरील ठेकेदारांवर कार्यवाही प्रस्तावीत करण्याच्या सुचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संदर्भात आढावा बैठकीत त्यांनी या सुचना केल्या. यावेळी आमदार कैलास पाटील हे उपस्थीत होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धाराशिव जिल्हयातील खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजुर कामे मागील 2 वर्षापासून प्रलंबीत होती. सदर कामे सुरु करुन त्यांचा काम पुर्ण होण्याचा कालावधी संपुनही कामे अद्याप अपुर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत या कामाचा आढावा घेणेबाबत (ता. 16) बैठक घेतली. जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र ,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कर्मचारी निवासाची विविध कामे, तसेच यापुढे सुधारणा न केल्यास संबंधीत ठेकेदारांना बाद करणेबाबत जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचना देण्यात आली. तसेच नव्याने पुर्ण झालेल्या दवाखाने करीता अपुर्ण कर्मचारी असल्याने आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाले आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ती पदभरती करुन आरोग्य सेवा सुरळीत करणेकरीता स्पष्ट सुचना करण्यात आली.
तसेच वेळोवेळी आवश्यक त्या ठिकाणी स्वत: पाहणी करुन कामाचा दर्जा व सध्यस्थिती याबाबत आढावा घेणार असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
आरोग्य अभियान अंतर्गत सदर बैठकीचे दरम्यान सर्व कामांचा दर्जा चांगला ठेवणेबाबत तसेच कामे वेळेत पुर्ण करणेबाबत अधिकारी व संबंधीत ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना सुचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परीषदचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान, इतर संबंधीत अधिकारी उपस्थीत होते. तसेच विविध एजंन्सीचे प्रतीनिधीही उपस्थीत होते.