धाराशिव (प्रतिनिधी)- गोवंशीय जनावरांचे जतन करणे, कॅन्सर रोगाला अटकाव करणे यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर दिल्ली येथे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत गोसंसद होत आहे. या संसदेतील ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी धाराशिवमध्ये व्यापक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती वैद्य नवनाथ दुधाळ यांनी दिली आहे.

गोमाता, ही प्रत्येकाकडे असायलाच हवी, गोमातेपासून कॅन्सर होत नाही. त्यांची कत्तल रोखण्यासाठी रजिस्टर गोशाळेला देण्यासाठी काही जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू केलेला आहे. प्रतिदिन एका गाय पालन पोषण करिता शंभर रुपये मानधन देण्यासाठीच शासनाने  4 जिल्यात सर्वे सुरु केला आहे. ही समाधानाची बाब आहे. परंतु वैद्य नवनाथ दुधाळ यांची मागणी सर्वांच्या गाईना एक जरी गाय असेल त्यानां पण मिळाले पाहिजे मिळे पर्यंत लढा सुरूच राहणार या संदर्भात माध्यमांशी बोलताना वैद्य दुधाळ म्हणाले, आज देशात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आणि हे रुग्ण वाचवायचे असतील तर आपल्याला गाईचे जतन करावे लागणार आहे. गोंवशच कॅन्सर मुक्त करू शकते, असा आपला दावा आहे. गोरक्षक समितीच्या माध्यमातून गावागावात गोधन जतन करण्याचा आपला प्रयत्न आहे. शंकराचार्य यांच्या उपस्थितीत 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान दिल्लीमध्ये भव्य अशी गोसंसद आयोजित करण्यात आलेली आहे.

या संसदेमध्ये राज्याचे नेतृत्व आणि गोमाता विषयावर बोलण्याची संधी मिळणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे या गोसंसदीय बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा ठोस कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात आपण राबवणार आहोत. साधारणपणे 10 ते 11 ऑगस्ट दरम्यान धाराशिव जिल्ह्यात या संदर्भात व्यापक बैठक घेतली जाणार आहे आणि यामध्ये गोपालक,गोरक्षक ज्या कुणाकडे गोवंशीय जातीची जनावरे नाहीत, मात्र या मोहिमेत काम करू इच्छितात अशा सर्वांना निमंत्रित केले जाणार आहे. अशी माहिती वैद्य दुधाळ यांनी दिलेली आहे.

 
Top