भूम (प्रतिनिधी)- भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी भूम यांना भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करण्यात यावे. तसेच 2020 ते 2021, 2023 व 24 चा शंभर टक्के व दुष्काळ जाहीर करून तसेच पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तसेच शेतकरी अतिवृष्टी, पिक विमा प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना इतर अनुदान रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रुपेश शेंडगे, सेवादलाचे प्रदेश सचिव शशीराज माने, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय तांबे, विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद शेखापूरकर, भूम तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागचे अध्यक्ष समीयोद्दीन काझी, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष शंभूराजे देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अण्णा महानवर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष बाशा शेख, किसान विभागाचे तालुकाध्यक्ष राम सावंत, सादिक शेख, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब देशमुख आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.