धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील कोकाटे गल्लीतील बालेकिल्ला प्रतिष्ठान ढोल ताशा पथकाचे पूजन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल शेख व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या हस्ते दि.29 जुलै रोजी करण्यात आला.
यंदाचा गणेशोत्सव जवळ येत असून या उत्सवामध्ये युवक व युवतींना ढोल व ताशाचा सराव चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी बालेकिल्ला प्रतिष्ठान ढोल ताशा पथकाचे मार्गदर्शक मिलिंद कोकाटे, प्रमुख आकाश कोकाटे, अध्यक्ष विवेक मुंगळे, सचिव ओमकार राऊत, कोषाध्यक्ष प्रणव घोडके, मिरवणूक प्रमुख पवन मिसाळ, संतोष कोकाटे, बाळासाहेब गोरे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष गौरव बागल, सनी मुंडे, समर्थ कोकाटे, आशुतोष कोकाटे, बाबा लोकरे, कृष्णा साळुंके, विशाल शेरकर, सुमित माने, आर्यन रणखांब, अभिजीत जाधव, प्रशांत कुदाळ, शुभम सुरवसे, अभय आंबेकर, अभिषेक मनसुके आदींसह सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.