तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेस शुक्रवार दि 5 जुलै 2024 रोजी रात्रीचे संपूर्ण पूजन संपन्न झाल्या नंतर श्री तुळजाभवानी देवीच्या श्रृंगार मध्ये सनातन वैदिक आर्य धर्मा नुसार नियमबाह्य चाँकलेट वस्तूचा हार वापर केले बाबत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहरातील महंत व हिंदुत्ववादी संघटनेने जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.
श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि दि. 5 जुलै 2024, शुक्रवार या दिवशी रात्री श्री देवीचे अभिषेक पूजन समाप्त झाल्यानंनंतर श्री देवीचे वस्त्रालंकार व आरती संपन्न झाली होती. नियमानुसार अलंकार पूजेनंतर श्री देवीच्या अलंकारास कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही. हा लिखित स्वरूपातला नियम आहे. तरी ही धार्मिक व्यवस्थापक सांगण्यावरून बदल करण्यात आला. संपूर्ण विश्वातील मंदिरामध्ये देवी देवतांची पूजा व अलंकार सनातन वैदिक आर्य धर्माच्या नियमानुसारच करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास ते परंपरा, रूढी तसेच धार्मिक नियमांची अवहेलना आहे. तरी धार्मिक व्यवस्थापक पदावर उपस्थित असणाऱ्या व्यक्तीला ह्या सर्व नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. परंतु दि.5 जुलै या दिवशी श्री देवीच्या अलंकारामध्ये प्लास्टिक मध्ये बंद केलेले चॉकलेट याचा हार घालण्यात आला. अश्या प्रकारच्या वस्तू देवतांच्या अलंकारांमध्ये निषेद्ध आहेत. या सर्व प्रकारामधून असे लक्षात येते की सदरील धार्मिक व्यवस्थापकस धर्म, रूढी, परंपरा या बाबतीत कोणत्याही प्रकारचे ज्ञान अवगत नाही. म्हणून त्यामुळे सदरील गैरप्रकार बद्दल योग्य ती कारवाई करून लेखी स्वरूपात आम्हास माहिती द्यावी.असे निवेदन दशावतर मठाचे महंत मावजीनाथ, महंत इच्छागिरी, गुरु हादेवगिरी, अनंत कृष्णकुमार कदम, सखाराम नंदीबुवा अंबुलगे, अँड. विक्रम मनोहर साळुंके (विश्व हिंदू परिषद), परिक्षित सुहासराव साळुंके (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), मकरंद राजकुमार भालकरे (हिंदुराष्ट्र सेना) यांनी दिले.