तुळजापूर (प्रतिनिधी)- रोटरी कल्ब तुळजापूरचा वतीने रोटरी अध्यक्ष म्हणून प्रशांत अपराध व रोटरी सचिव संतोष लोखंडे यांच्या पहिल्या सामाजिक उपक्रम अंतर्गत शालेय विध्यार्थीनीना पाच सायकली व पाचशे वृक्ष वाटप करण्यात आले.

याप्रसंगी  पीडीजी डाँ. रवि वदलामणी, डीजीई सुरेश लातुरे, पीडीजी विष्णू मुंढे, एजी विठ्ठल वंगा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी अध्यक्ष म्हणून प्रशांत अपराध यांनी स्वतः कन्या शाळेमधील मुलींना 5 सायकलिंचे वाटप केले. तसेच रामवर्दायिनी शाळा व नगरपरिषद 3 नंबर शाळा यांना शालेय साहित्याचे वाटप व 500 वृक्ष वाटप करण्यात आले करण्यात आले. यावेळी रोटरी पदाधिकारी सदस्य उपस्थितीत होते.


 
Top