तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरात सर्व  भाविकांना महाद्वार मधुन प्रचलित पध्दतीने दर्शनार्थ सोडले जाणार असून, उंबरझरा येथे दर्शन मंडप उभारण्यात येणार असल्याने शहरवासियांनी विकासकामे करताना आपल्यावर अन्याय होणार आहे अशा संभ्रमावस्थेत राहु नये, अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर येथे पञकारांशी संवाद साधताना दिली.

आमदार पाटील स्थानिक पञकारांशी बोलताना म्हणाले कि, तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात विविध टप्याच्या माध्यमातून विकास कामे केले जाणार असुन पहिला टप्पा पुरातत्व विभाग संबंधित मंदीर परिसराचा केला जाणार आहे. दर्शन मंडप काम दुसऱ्या टप्यात केले जाणार आहे. विकास कुणावर अन्याय करुन  करावयाचा नाही. विरोधात तथ्थ असेल तर निश्चितपणे विचार केला जाईल. दहा पैकी आठ विकासाला समर्थन करीत असतील दोन जण विरोध करीत असतील तर त्याला नाईलाज आहे. त्यामुळे विकासा बाबतीत राजकारण करु नये. आपण ऐतिहासिक काम करतोय ते सर्वाचा सहभागाने करावयाचे असल्याने यासाठी मनापासून सहकार्य करा. विकास बाबतीत संभ्रमावस्था असेल तर थेट मला संपर्क करा. पण या कामाला सहकार्य करा असे आवाहन यावेळी केली. 

लवकरच 65 कोटीचे विकास कामांचे टेंडर निघणार असुन या महिन्याचा शेवटचा आठवड्यात आराखड्यास मान्यता मिळणार असल्याचे सांगितले. तिर्थक्षेञ तुळजापूर विकासासाठी केंद्र राज्य सरकार बरोबर सीआरएस मंदीर माध्यमातून निधी उपलब्ध करुन घेतला जाणार आहे. उंबरझरा येथे दर्शन मंडप उभारणी काम तांञीक दृष्ट्या आवाहनात्मक होते ते आव्हान स्विकारुन काम पुर्ण केल्याचे यावेळी स्पष्ट केले. आराधवाडी येथे फक्त बारा मीटरचा रस्ता केला जाणार आहे. विकास कामांसाठी जागा लागते. त्यासाठी जागा उपलब्ध करुन द्या तिथे विकासकामे करु असे आवाहन केले.

108 फुट पुतळा रामदरा तलाव व्यतिरिक्त इतर ठिकाणी योग्य लोकशन नसल्याचे यावेळी म्हणाले.  तिर्थक्षेत्री रोज दहा हजार भाविक निवास करावेत असे नियोजन असुन यामुळे रोजगार निर्मीती होवुन तिर्थक्षेञ तुळजापूरच्या अर्थकरणाला चालना मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, विनोद गंगणे, नरेश अमृतराव, अविनाश गंगणे सह भाजप पदाधिकारी उपस्थितीत होते.

 
Top