धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात क्रांतिकारी नेते, समाजसुधारक लोकमान्य टिळक यांची 168 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
'स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध ह्क्क आहे, आणि तो आम्ही मिळवणारच' असा नारा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वातंत्र्य लढ्यातील आक्रमक नेते होते. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन, पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले. यावेळी विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे, सहाय्यक कुलसचिव भगवान फड, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव,कमवा व शिका योजना समन्वयक डॉ. गोविंद कोकणे, व्यवस्थापनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुयोग अमृतराव, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, डॉ. महेश्वर कळलावे, प्रा. सचिन बसैयै, डॉ. जितेंद्र शिंदे, ग्रंथालय सहाय्यक तुकाराम हराळकर, वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत आनंदगावकर, विश्वास कांबळे, संजय जाधव, शिवाजी माने, धनराज सोमवंशी, श्रीकांत सोवितकर, विठ्ठल कसबे इ. उपस्थित होते.