तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ शेगाव येथुन आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे  निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पायीवारी पालखी सोहळ्याचे सोमवारी दुपारी चार वाजता रांगोळी व फुलांच्या पायघड्यावरुन तिर्थक्षेञ तुळजापूर येये आगमन झाले.  या  पालखीतील सातशे वारकऱ्यांंनी टाळमृदंग गजर करीत कमानवेस मार्ग राजे शहाजी महाध्दार  येथे दाखल होताच येथे श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्यावतीने पालखीतील श्रीगजानन महाराजांच्या मुर्तीस हार घालुन दर्शन घेतल्यानंतर  पालखी प्रमुखाचे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांनी स्वागत केले. यावेळी मंदीराचे कर्मचारी उपस्थितीत होते. 

सर्व वारकरी श्रीतुळजाभवानी मंदीरातील श्रीगोमुख तिर्थकुंडात हातपाय धुवुन टाळमृदंगच्या गजरात श्रीतुळजाभवानी मंदीरात जावुन देविचे मनोभावे दर्शन घेतले. नंतर भवानी रोडमार्ग छञपती शिवाजी महाराज पुतळा मार्ग विश्रांती साठी लोहीया मंगल कार्यालयाकडे रवाना  झाली. येथे  राञी श्री गजाजन  महाराजांची आरती करण्यात आल्यानंतर किर्तन कार्यक्रम झाला. नंतर  भोजन घेऊन वारकरी विसावले.  तिर्थक्षेञ तुळजापूर येथे वारक-यांना जागोजाग चहा पानी, फळे, अल्पोपहार देऊन पाहुणचार केला. पालखी शहरातुन जाताना, शहरातील दर्शनार्थ आलेले भाविक व  शहरवासियांनी पालखी  दर्शनासाठी

गर्दी केली होती.


मराठवाड्यातुन पश्चिम महाराष्ट्रात रवाना

मंगळवार पहाटे संत श्रीगजानन महाराजांचा पादुकांनाअभिषेक करण्यात आल्यानंतर आरती करण्यात आलीनंतर रामप्रहरी पालखी टाळमृंदगगजर करीत घाटशिळ घाटातुन पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयाकडे रवाना झाली. यावेळी सिंदफळ सांगवीकाटी तामलवाडी येथे पालखीचे गावोगाव स्वागत करण्यात आले तामलवाडीतुन पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाली.


 
Top