तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी  तुळजाभवानी  मातेच्या  पुण्यपावन  शक्तिपीठ येथून आषाढी वारी प्रतिवर्षा  प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त शक्तीपीठ ते भक्तीपीठ पायी दिंडी शुक्रवार  दि. 12 जुलै रोजी सकाळी सात वाजता कासार गल्ली येथील विठ्ठल मंदिर येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तरी या वारीमध्ये येणाऱ्या वारकरी बंधूंनी व भगिनींनी दिंडीचे संयोजक अमर मगर, नाना हिबारे, सुहास साळुंके, सुदर्शन वाघमारे, नितीन मस्के, वल्लभ काका कदम यांनी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 
Top