तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपद मागील ऐक वर्षा पासुन रिक्त असल्याने या पदावर युवा नेते रुषीकेश यांची नियुक्ती करण्याची मागणी  तालुक्यातील  काँग्रेस पदाधिकारी कार्यकत्यांन मधुन केली जात आहे.

तुळजापूर तालुका हा ऐकेकाळी काँग्रेस चा बालेकिल्ला  होता. माञ या बालेकिल्यास भाजप ने छेद दिला त्यानंतर काँग्रेस पक्षात बरीच उलथा पालथा झाली. मागील एक वर्षापासून काँग्रेस तालुकाध्यक्ष पद रिक्त असल्याने तालुक्यातील काँग्रेस कार्यकत्यांमध्ये चलबिचल होवुन कामासाठी कुणाकडे जावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रुषी मगर यांनी संपुर्ण तालुका पिंजुन काढुन महाविकास आघाडी उमेदवारास  प्रचंड मताधिक्य मिळवुन विजयात मोठा हातभार लावला आहे. माञ काँग्रेस तालुकाध्यक्ष पद रिक्त असल्याने तालुक्यातील कार्यकत्यांमध्ये शिथलता आली. यामुळे पक्ष काम तालुका स्तरावर अपेक्षित वेगाने होत नाही. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर रिक्त तालुकाध्यक्ष पद भरणे गरजेचे आहे. जर पक्षाला तालुकाध्यक्ष नसेल तर विधान सभा मतदार संघावर दावा करणे कठीण जाणार आहे. तसेच पक्ष कार्यकत्यास नेतृत्व मिळाले तर आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ता सक्रिय होणार आहे.

रुषी मगर युवा असुन ते अभियंते असल्याने सुशिक्षित वर्गातील असुन त्यांच्या कडे संघटन कौशल्य असल्याने व काँग्रेस  त्यांना  मध्ये मानणारा वर्ग मोठा आहे. पक्ष संकटात असताना त्यांनी पक्षाची अधिक पडझड होवू दिले नाही. तसेच सताधारी भाजपला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जबरदस्त लढत  दिली. त्यामुळे ते काँग्रेस मध्ये एकमेव पदाला पाञ असल्याने त्यांची विधानसभा निवडणूक पुर्वी नियुक्ती करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते करीत आहेत.

 
Top