तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जि. धाराशिव मार्फत आई तुळजाभवानी मंदिराचा व परिसराचा प्रस्तावित नविन विकास आराखडा (Plan B) मंदिर बेबसाईटवर https://shrituljabhavanitempletrust.org प्रसिद्ध केलेला आहे. या आराखड्यावरती आपली मते किंवा सुचना सात दिवसाच्या आत (दि. 23/07/2024 पर्यंत) मंदिर प्रशासन कार्यालय तुळजापूर येथे लेखी स्वरुपात किंवा ईमेल व्दारे (dprshrituljabhavanitemple@gmail.com) असे आवाहन मंदीर समितीने केलेले आहे.

श्री तुळभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर विकास आराखडा उद्दिष्ट तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक नागरिक व भाविकांचा त्रास कमी करून पायाभूत सुविधांवरचा ताण कमी करण्यासाठी शाश्वत उपाययोजन तयार करणे. भक्तांचा दर्शनाचा अनुभव समृध्द व सुकर करण्यासाठी दीर्घकालीन सयंत्रणा उभी करून इतिहास, संस्कृती, वारसा व अध्यात्मीक मांगल्य जतन करणे. सदरील उद्दिष्ट गाठणे हेच विकास आराखडा तयार करण्या मागचे मुळ ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे.

श्रीतुळजाभवानी मंदीर हे तेरावे शतकातील असुन वर्षानुवर्षे येथे गर्दी वाढत चालल्याने मुलभुत सुविधेवर ताण येत असल्याचा पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे तीन टप्यात विकास कामे केले जाणार आहेत. पहिला टप्पा मायको असुन यात रस्ते विस्तार रस्ते जोडणी केली जाणार आहे. दुसरा टप्पा शहरातील कुंड नुतनीकरण करुन छोटेमोठे मंदीरे व रस्ते सुशोभिकरण करणे, तिसरा टप्पा मायक्रो मध्ये गर्दी नियंत्रण भाविक सुविधा केंद्र व कुलाचार स्थळ निर्माण करणे आहे. भवानी मार्ग व महाध्दार मार्ग सुशोभित करुन  पुर्वपार पारंपारिक पध्दतीने मार्गाने महाध्दार मधुन कल्लोळ तिर्थ बाजूने  मंदीरात दर्शनार्थ प्रवेश दिले जाण्याचे नियोजन आहे. येथे पुरातत्व विभागाचा मार्गदर्शन खाली पुर्वीच्याच जागेवर महाध्दार उभे केले जाणार आहे यातुन कळस दर्शन घडवे असे नियोजन आहे.


शिवउद्यान उभारणार

रामदरा तलाव परिसरातील दोनशे ते अडीचशे एकर जागेचा नव्याने विकास केला जाणार आहे.येथे  शिवउद्यान उभारले जाणार आहे. येथे रामदरा तलाव बाजुचा डोंगरावर 108 फुट उंच अशी श्रीतुळजाभवानी माता छञपती शिवाजी महाराज यांना आशिर्वाद रुपी भवानी तलवार देत असल्याचे शिल्प साकारले जाणार आहे. तसेच लातुर रोडवरील पाचुंदा तलाव परिसरात दोनशे एकरवर टीपी स्कीम शहराच्या सर्वागीन विकासासाठी राबवलि जाणार आहे. येथे भव्य असे उद्यान उभारले जाणार आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर वैभवात भर घालणारा भक्त व स्थानिक यांचा विचार करुन हा विकास आराखडा सादर केला जाणार असल्याचे सांगितले जाते आहे.

 
Top