भूम (प्रतिनिधी)-राजे संभाजी पब्लिक स्कूल ईट (ता.भूम) (ता.3) बुधवार रोजी सकाळी 11 वाजता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी दीप प्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महारुद्र मोटे, शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थाचे सचिव प्रा. डॉ. आप्पासाहेब हुंबे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पद्माकर चव्हाण उपस्थित होते. यावेळी पालक सभेतून शालेय व्यवस्थापन समितीची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अशोक तुकाराम जालन तर उपाध्यक्षपदी रोहिणी अरुण बोंदार्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

समिती सदस्य म्हणून माधुरी अविनाश चव्हाण, पद्माकर चव्हाण, अतुल डोके, अशोक मोटे,समाधान हाडूळे, नवनाथ चोरमले, शितल खामकर, वर्षा मांडवे,हनुमान हुंबे,दक्ष डोके,आरोही मांडवे, सुनीता भोईटे यांची निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक महावीर जालन, प्रा.भाऊसाहेब हुंबे, प्रा.भारती आसलकर, प्रा. आकांक्षा जाधव, सुनिता भोईटे,सपना कावळे, पल्लवी खारगे,सुधा जोशी, नेहा धोत्रे,भाग्यश्री पवार,उज्वला हुंबे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून ज्ञानेश्वर हुंबे, विवेक डीकुळे, सुरज लोळके, प्रियंका माने, आप्पा आल्हाट आदींनी परिश्रम घेतले होते.


 
Top