धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद प्रथमिक शाळा आळणी येथील ईश्वरी गणेश निंबाळकर ही 298 पैकी 234 गुण घेऊन जिल्ह्यात 34 वी आली व गुणवत्ता धारक झाली. तसेच आदित्यराज बाबासाहेब पौळ (156)व प्रतीक पद्माकर नांदे (158) हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. तसेच ईश्वरी निंबाळकर हिने भारतीय सैनिक स्कूल परीक्षेत 300 पैकी 210 गुण घेऊन प्रवेश पात्र झाली. मंथन परीक्षेत 300 पैकी 258 गुण घेऊन राज्यात 21 वी, जिल्ह्यात बारावी तसेच केंद्रात तिसरी आली आहे. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे सदर विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी प्रस्ताविकातून आळणी शाळेत एकूण दहा स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येते असे सांगितले. सदर दहा स्पर्धा परीक्षेत तब्बल 74विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. या पुढे फक्त गुणवंत्तेवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी बाबासाहेब पौळ, खंडू कदम, गणेश निंबाळकर या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच यावेळी पाचवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षिका  क्रांती मते यांचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  विजयकुमार नांदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापण समितीच्या उपाध्यक्षा अफसाना शेख, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम, संजीवनी पौळ होत्या. तसेच सदर कार्यक्रमासाठी विकास पाटील, वैभव वीर, खंडू कदम, गणेश निंबाळकर, बाबासाहेब पौळ, बाळासाहेब माळी, जयंत माळी, विनोद वीर, महेश वीर, भामाबाई नांदे उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन सुलक्षणा म्हेत्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन  राधाबाई वीर यांनी आभार मानले. कार्यकम यशस्वी करण्यासाठी वर्षा डोंगरे, सुनीता कराड, मंजुषा नरवटे, दिनेश पेठे, उत्तम काळे, हनुमंत माने, श्रीमती अश्विनी भांगे यांनी परिश्रम घेतले.

 
Top