तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष रामचंद्र आलुरे यांना त्यांचा निवडीचे पञ सोमवार दि. 29 जुलै रोजी बाभळगांव, ता.जि.लातुर येथे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री व आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते जिल्हा कांग्रेस कमिटीचे धाराशिव अध्यक्ष ॲड धिरज कदम पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्ती पञ देण्यात आले. यानंतर नुतन तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबदल रामचंद्र आलुरे व आमदार अमित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जि. प. माजी सदस्य बालाजी बंडगर, उमेश ताबे, माजी सरपंच कुभारी ग्राप. सदस्य संतोष वडणे, संजय कदम, चंद्रकात सोनवणे, आबा गाढवे, जुबेर शेख, संजय देशमुख, उपसरपंच काटी सह कांगेसचे आजी माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.