तुळजापूर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर हे एसटी, एससी, ओबीसी आरक्षण बचाव रँली निमीत्ताने तिर्थक्षेञ तुळजापूरला सोमवार दि. 29 जुलै रोजी आले असता प्रथम महाराष्ट्राची कुलस्वामिनी स्वामींनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. नंतर मातंगी देवि मंदीरात जावुन मातंगी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदीर प्रशासकीय कार्यालयात प्रशासकीय अधिकारी तथा तहसिल सोमनाथ माळी यांनी देविची प्रतिमा देवुन सत्कार केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकु, अँड भोसीकर, रमेश बारसकर, मिलींद रोकडे, जीवन कदम उपस्थितीत होते. नंतर जाहीर सभेस संबोधण्यात आले.