कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी  येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा आयोजित करण्यात आली होती.या पालक सभे मधुन अतिशय खेळीमेळीच्या शांततापूर्ण वातावरणात महिला राज बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी अंजली यशवंत जाधव, उपाध्यक्षपदी निलम नवनाथ धेले यांची निवड करण्यातआली. सदस्यपदी कविता अनंत गायकवाड, वर्षा धनंजय पिंगळे, राणी किशोर लांडगे, जयश्री किसन शिंदे, रेवती स्वप्निल पिंगळे, सर्व पालक सदस्य महिला आहेत. ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अर्जुन धर्मराज जाधव, शिक्षणतज्ज्ञ बालाजी चिंचकर व संदीप लांडगे यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व कार्यकारिणीचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील निवडीसाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे सर्व पालकांनी सांगितले.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी पालकांनी केलेल्या विधायक सुचनेनुसार शाळेचा शैक्षणिक आलेख सर्व शिक्षकांच्या, पालक,ग्रामस्थांच्या सहकार्याने उंचावर नेउ असे सांगितले. या पालक सभेसाठी सहशिक्षक धनंजय गव्हाणे, मनिषा पवार, सरोजिनी पोते, सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.

 
Top