लातूर (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगीण विकास मंडळ लातूरच्या वतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार दि. 04 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 10 वा. रामलिंगेश्वर मंदिर, काळे गल्ली, पटेल चौक, लातूर येथे आयोजित केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2023 - 24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 75 टक्के, - 550, - 60 टक्के, - 80 टक्के पेक्षा अधिक गुण, व पात्रताधारक, सेट, नेट, पीएचडी प्राप्त व पदवी पदव्युत्तर ( व्यावसायिक अभ्यासक्रमासह ) परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या गुणगौरव समारंभात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शनही लाभणार आहे. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व जात प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत गुरूवार, दि. 01 ऑगस्ट 2024 पर्यंत पुढील ठिकाणी जमा करावेत.
ॲड. मा. गो. मांडुरके गोविंद सदन केशवनगर, डॉ. सिद्राम सलगर आनंद क्लिनिक शाहू चौक, ॲड. एम. बी. डोणे अक्षय बॉईज हॉस्टेल संभाजीनगर, गोपाळराव सुरवसे अजित मेडिकल चंद्रनगर, खंदारे मेडिकल राजश्री शाहू महाविद्यालयाजवळ चंद्र नगर, सुभाष लवटे श्रीराम एजन्सी सुनील टेरेसेस मेन बस स्टॅन्ड बाजूला, इंजि. सिंधीकुमटे पोलीस स्टेशन समोर शिवाजी चौक, ॲड.राजेश बनसोडे त्रिमूर्ती सर्विसेस शिवाजी चौक, उद्धव दुधाळे न्यू जया फर्निचर कन्हेरी रोड, भंडे सर्विसेस मुक्ताई मंगल कार्यालयासमोर अंबाजोगाई रोड, सिद्धनाथ मल्टीसर्विसेस राजीव गांधी चौक, मदने मेडिकल स्टोअर तहसील कार्यालय समोर, प्रथमेश मेडिकल स्टोअर पटेल चौक, डॉ. विनोद सलगर भाग्यश्री क्लिनिक स्वामी विवेकानंद चौक, ॲड.सिध्देश्वर धायगुडे यशोदा कॉम्प्लेक्स अहिल्यादेवी होळकर चौक लातूर या ठिकाणी धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगीण विकास मंडळ, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9960675777, 9763779723 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.