परंडा (प्रतिनिधी)- शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रकास अनुसरून जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथे दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 22 जुलै 2024 रोजी प्रशालेत अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक दिनकर पवार,सहशिक्षक भाऊसाहेब सूर्यवंशी,आबासाहेब माळी,शुभांगी देशमुख यांनी अध्ययन अध्यापन साहित्याचे महत्व समजावून सांगितले व ते कसे तयार करावे त्याचा अध्ययन अध्यापन करताना कसा वापर करावा हे समजून सांगितले. तसेच मुलीना साहित्य निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आले.
दिनांक 23 जुलै रोजी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस,दिनांक 24 जुलै क्रिडा दिवस, दिनांक 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस दिनांक 26 जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, 27 जुलै रोजी इको क्लब व शालेय पोषण दिवस तसेच दिनांक 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस याप्रमाणे सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे या उपक्रमात शालेय मुला, मुलींनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक दिनकर पवार यांनी केले आहे.