उमरगा (प्रतिनिधी)- कोल्हापूरच्या विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या, छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा उमरगा तालुका मुस्लीम बांधवांच्या वतीने सोमवारी (दि. 22) उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
मरकज मज्जिद येथून काळ्या फिती लावुन उपविभागीय अधिकारी कार्यालावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मुस्लीम समाजावर हल्ले करणे, धार्मिक स्थळावर हल्ले करुन वित्तहानी करण्याचा प्रकार महाराष्ट्र सारख्या शाहु, फुले, आंबेडकर यांच्या कर्मभूमी आखलेल्या राज्यामध्ये होणे निंदणीय आहे. या घटनेस कारणीभूत असलेल्या लोकांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, तेथील मुस्लीम समाज व धार्मिक स्थळे यांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर माजी नगराध्यक्ष अब्दुल रजाक अत्तार, बाबा जाफरी, जाहेद मुल्ला, बाबा औटी, प्रा. शौकत पटेल, अमजद मणियार, वहाब अत्तार, अझहर शेख, मुर्तुजा मुंगले, युनूस मोहियोद्दीन, शमशोद्दीन जमादार, नदीम मुजावर, मुजीब इनामदार, समीर हाफीजबाब, हाफीज पिरजादे, राजु मुल्ला, अखिल जमादार, फैसल पटेल, अँड. एस. पी. इनामदार आदी समाज बांधव उपस्थित होते.