धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने वर्षभर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दर महिण्यातील 26 तारखेला संविधानावरती व्याख्यान,संविधान उद्देशिका वाचन करुन भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जनजागरण केले जात आहे. राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यालयात भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी मतदार जनजागरण समितीचे गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने, अंकुश उबाळे, बंन्शी कुचेकर, संपतराव शिंदे, बाबासाहेब बनसोडे, बापु धावारे सह अन्य इतर उपस्थित होते. प्रस्तावना बंशी कुचेकर यांनी तर आभार संजय गजधने यांनी मानले.