धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय व विशेष सहाय्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  हसनजी मुश्रीफ आपले मतदार संघातील सहकारी यांच्यासोबत तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूर येथे आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र  धूरगुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिवच्या वतीने सत्कार केला. 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. हसन मुश्रीफ साहेबांनी  विविध विषयावरती उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.  जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी जिल्ह्यातील पक्षांच्या कामगिरीविषयी व  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण जिल्हाभर राबवत असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष संदीप गंगणे, तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार,युवक तालुकाध्यक्ष नितीन रोचकरी,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, तुळजापूर शहर कार्याध्यक्ष दिनेश क्षीरसागर, धाराशिव शहर कार्याध्यक्ष अकबर खान पठाण, सोशल मीडिया तुळजापूर तालुकाध्यक्ष बबनराव गावडे, सामाजिक न्याय तुळजापूर तालुका अध्यक्ष विनोद जाधव, तुळजापूर शहर सरचिटणीस अभय माने,विकी घुगे, गोरख पवार चंकी साळुंखे, महादेव कदम, दादा परमेश्वर आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.

 
Top