धाराशिव (प्रतिनिधी)-सकल धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती निर्णयाची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देणारे देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय  समोर धनगर बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषण ठिकाणी रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक तथा भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. व्यंकटराव गुंड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले.

यावेळी उपोषणास बसलेले शाम तेरकर, कमलाकर दाने, समाधान पडळकर, राजू मैदाड व त्यांच्या सहकाऱ्यां सोबत विचारविनिमय केला.  धनगर समाज उपोषण आंदोलकांनी  आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी तसेच धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करून प्रमाणपत्र द्यावे ही न्याय मागणी संविधानास धरून असल्याचे यावेळी अँड. गुंड यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ वैद्य, प्रा. सोमनाथ लांडगे, बालाजी गावडे, अशोक गाडेकर, राजेंद्र कापसे, सुभाष मैदाड, अमोल मैदाड,  दादा वाघे, बालाजी वगरे, गजानन पाटील, श्रीकांत तेरकर, बालाजी तेरकर, गणेश सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top